Tuesday, 15 January 2013

प्रेम करतो तुझ्यावर...
सोडून मला जाऊ नकोस...

खुप स्वप्न बघितलित.....
तोडून कधी जाऊ नकोस....

कधी प्रेम करायचीस माझ्यावर...
हे कधी विसरु नकोस.....

नको करूस प्रेम...
तिरस्कार मात्र करू नकोस...

विसरलीस माझ प्रेम तरी चालेल....
मैत्री माझी विसरु नकोस.....

सोडून गेलीस तू मला....
प्रेम माझ विसरु नकोस...

मरणाच्या वाटेवर असताना...
कालजी माझी करू नकोस...

मरण जरी आल मला....
मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस..
दुख: व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात
जेंव्हा आपलेच जवळचे दुख: देवून जातात.
आठवणीचे क्षण मागे ठेवून जातात
संथ आशा सागरात लाटा उसळून येतात.
हास-या चेह-या वरती काळे ढग जमू लागतात
नकळत पापण्या ओल्या होवून जातात .


तुझ्या सहवासात असतांना
तुला एकटक न्याहाळतां ना
तुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांना
तुझ्या सोबत जगायचे
राहूनच गेले
तू रागावशील, सोडून जाशील
मैत्रीचा धागा तोडून जाशील
माझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे
राहूनच गेल..................

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते, प्रश्न कधी कधी कळत
नाहीत आणि उत्तर चुकत जाते, सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, पण प्रत्येक
वेळी नवनवीन गाठ बनत जाते, दाखविनाऱ्याला वाट माहित नसते, चालणाऱ्याचे
ध्येय मात्र हरवून जाते, दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी,
"अनुभव" म्हणजे काय हे तेव्हाच कळते.